सातारा : सातारा शहरात जुगार खेळत असताना पोलिसांनी कारवाई करत अशोक मनोहर गिते (वय ४४, रा. रघुनाथपुरा पेठ) आणि सोमनाथ शरद चोरगे (वय ३९, रा. शनिवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून पोलिसांनी ८४० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.