सातारा : सातारा शहरात अवैध जुगारविरोधात पोलिसांनी कारवाई करत गणेश एकनाथ रणखांबे (वय ५२, रा. केसरकर पेठ, सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी गुरुवार पेठ परिसरात छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान रणखांबे याच्याकडून रोख ६५० रुपये तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तो बेकायदेशीरपणे जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास सातारा शहर पोलीस करत असून, अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.