सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पती किरण मोरे, माधवी मोरे, राजेंद्र मोरे (रा. गोडोली, सातारा), अर्चना रसाळ यांच्या विरुध्द सोनाली किरण मोरे (वय २६, रा. गोडोली) यांनी तक्रार दिली आहे. एप्रिल २०२३ पासून वेळोवेळी आयफोन घेवून ये, असे म्हणत इतर कारणावरुन जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.