सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 197 कोटी 88 लाखाचा करोत्तर नफा

बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन काका पाटील यांची माहिती

by Team Satara Today | published on : 14 May 2025


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2024 -25 या आर्थिक वर्षात 197 कोटी 88 लाखाचा करोत्तर नफा झाला आहे. यामध्ये बँकेने 35 कोटी 60 लाख रुपयांचा कर भरला असून बँकेने यंदा 19 हजार 61 कोटी 98 लाखाचा व्यवसाय केला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा खासदार नितीन काका पाटील यांनी दिली आहे. 

यावेळी बँकेचे प्रमुख मार्गदर्शक संचालक माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राजेंद्रशेठ राजपुरे, कांचन साळुंखे, दत्तानाना ढमाळ, शिवरूपराजे खर्डेकर, संचालक प्रदीप विधाते, बँकेचे सीईओ राजेंद्र सरकाळे इत्यादी यावेळी उपस्थित होते. 

नितीन काका पाटील पुढे म्हणाले 2024 -25 या आर्थिक वर्षात बँकेने 233 कोटी 47 लाख रुपयाचा ढोबळ नफा कमवला आहे. चालू आर्थिक वर्षात 35 कोटी 60 लाख रुपयांचा आयकर भरण्यात आलेला आहे. त्यामुळे बँकेला 197 कोटी 88 लाख रुपये इतका करोत्तर नफा झाला आहे. बँकेच्या स्व निधीमध्ये 82 कोटी 96 लाख इतकी भरीव वाढ झाली असून बँकेचा स्व निधी 1060 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या ठेवी 11,468 कोटी रुपयांच्या असून कर्जे 7593 कोटी रुपयांची देण्यात आली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 19 हजार 61 कोटी 98 लाख रुपये इतका झाला आहे. दरवर्षी प्रमाणे बँकेचे ढोबळ अनुत्पादक कर्ज या आर्थिक वर्षांमध्ये 104 कोटी एक लाख रुपये आहे एकूण कर्जाचे हे प्रमाण 1.77 इतके आहे निव्वळ अनुत्पादक कर्जे प्रमाण गेल्या 18 वर्षांमध्ये शून्य टक्के इतके आहे. 

एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सामंजस्य करार करून जिल्हा बँकेने ऊस लागण व उत्पादन वाढीसाठी करार केला आहे सहकारी व खाजगी कारखान्याच्या माध्यमातून 1000 शेतकर्‍यांना दहा हजार रुपये याप्रमाणे एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. शेतकर्‍यांच्या शेतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली उभी करावयाचे आहे, त्यांना अर्थसहाय्य केले जाणार आहे. जिल्हा बँकेच्या नोकर भरती बाबत नितीन पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, येत्या वर्षभरात जितकी पदे रिक्त होतील त्या पदांचा आढावा घेऊन त्यांचा आकृतीबंध हा सहकार आयुक्तांकडे पाठवला जाऊन त्याची मंजुरी घेण्यात आली आहे पुढील दोन टप्प्यांमध्ये ही नोकर भरती केली जाणार असल्याची त्यांनी स्पष्ट केले. या आकृतीबंधाला सहकार आयुक्त त्यांनी मान्यता सुद्धा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बँकेने विकास संस्था सभासदांना मध्यम व दीर्घ मुदत कर्ज वसूल पात्र हप्त्यावर साडेपाच ते साडेआठ टक्के व्याज सवलत दिले असून सहा कोटी व्याज परतावा तरतूद केली आहे. शेतकरी सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जावर व्याज परताव्यासाठी दोन कोटी 69 लाख रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे शैक्षणिक कालावधीत शैक्षणिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने प्राप्त होत आहे. अशा प्रकारचा पतपुरवठा करणारी सातारा जिल्हा बँक ही महाराष्ट्रात एकमेव असल्याचे त्यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रासपची निदर्शने
पुढील बातमी
शिवसेना पदाधिकारी सादिक बागवान यांचे पालिकेसमोर अन्नत्याग आंदोलन

संबंधित बातम्या