गुजरातमधील भाजपाच्या विजयाचा साताऱ्यात जल्लोष

by Team Satara Today | published on : 19 December 2017



सातारा : अपेक्षानुसार गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये भाजपची सत्ता राखली. या निकालाने साताऱ्यातील भाजपा व गुजराथी बांधवानी जल्लोष केला.
गेली पंधरा दिवस गुजरात निवडणुकीकडे संपूर्ण भारताने लक्ष केंद्रित केले होते. अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले पण, अखेर भाजपाने बाजी मारली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रमुख गावात आजही अनेक गुजराथी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. महाराष्ट्राच्या तेसेच ते राजकारणात सक्रीय सुद्धा असतात. मात्र तरीही मातृभाषा व आत्मीयता गुजराती बांधव विसरले नाहीत. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीसाठी काही मतदार संघात मतदान केंद्रावर जाऊन सातारा जिल्ह्यातील गुजराथी बांधवांनी मतदान केले होते. विशेषता: कारागीर, कामगार यांना सातारा जिल्ह्यातून घेवून गुजरातला सोडण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था केली होती. आज निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.
सातारा शहरात भाजप अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद काकडे, नगरसेवक विजय काटवटे, नगरसेविका सिद्धी पवार, विठ्ठल बालशेठवार व गुजराथी समाजातील लोकांनी कंदी पेढे वाटून आनंद साजरा केला.
काँग्रेस पक्षाने ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील सर्व भाजपच्या नेत्यांना गुजरातमध्ये येण्यास भाग पाडले आहे. तसेच काँग्रेसनेही चांगली लढत दिली आहे. त्याचेही सातारा जिल्ह्यातील काँग्रेस जण कौतुक करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
लेखकाकडून अखेर दिलगिरी ;घोडचूक केल्यास याद राखा !

संबंधित बातम्या