सातारा : सातारा शहर परिसरात चोरट्यांनी पिरवाडी व कोडोली येथे बंद घरांना टार्गेट करुन घरफोड्या केल्या. यामध्ये लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिरवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातील सोन्याची चेन, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे पदक, कानातील टॉप्स असा 1 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. 21 मे रोजी घडली आहे. याप्रकरणी निलेश निवृत्ती घुले (वय 39, रा. पिरवाडी ता.सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दुसरी घटना कोडोली येथे घडली आहे. अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन 69 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. यामध्ये सोन्याची चेन, अंगठी, कानातील टॉप्स याचा समावेश आहे. याप्रकरणी राहूल महादेव करंडे (वय 30, रा. कोडोली, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 21 मे रोजी घडली आहे.