सातारा : खटाव तालुका खटाव येथे टपरी चालकाने मसाला पानाचे पैसे मागितले. म्हणून राग आलेल्या दोघांनी टपरी चालकाच्या मालाचे नुकसान करून त्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनिल बबन आवळे वय- 36 वर्ष यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बचाराम मदने, करण बचाराम मध्ये दोघे मूळ राहणार जाखणगाव, तालुका खटाव सध्या राहणार खटाव या दोघांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद नोंद झाली आहे. आवळे यांनी दिनांक 29 रोजी सायंकाळी साडेआठ वाजता पान टपरीवर आलेल्या दोघांना मसाला पानाचे पैसे मागितले. म्हणून या दोघांनी पान टपरी पेट्रोल टाकून ती पेटवून देण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने पुन्हा माघारी येऊन त्यांनी टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केली आणि हातातील कोयत्याने पानटपरीचे कुलूप तोडून आतील मालाचे नुकसान केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम अधिक तपास करत आहेत.