सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अजंठा चौक परिसरात किरकोळ कारणावरून शिवम दीपक पाटील रा. देगाव, ता. सातारा यांना लोखंडी रॉड, कळकाची काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी योगेश शर्मा आणि सुरज कांबळे (पूर्ण नाव, पत्ते माहीत नाहीत) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.