सातारा : एकास धमकी दिल्या प्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राजवाडा रिक्षा स्टॉप येथे चंद्रकांत लक्ष्मण पोळ रा. माची पेठ, सातारा यांना तेथीलच अमीन शौकत शेख आणि रेश्मा आमिन शेख यांनी दमदाटी केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करीत आहेत.