सातारा : शुक्रवारी (दि. २०) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रामदेव स्टील ॲण्ड टिंबर्स, कृष्णानगर, कोरेगाव रोड, सातारा येथे शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी येथीलच दोघांविरुध्द सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फिर्यादी राणी प्रफुल्ल शहा (वय ४३, रा. पवार कॉलनी, शाहूपुरी, ता. जि. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यांच्या तक्रारीनुसार, संबंधित ठिकाणी असलेल्या दुकानाचे बांधकाम सुरू असताना संशयित आरोपी ममता आचलचंद जैन व दीपक आचलचंद जैन यांनी फिर्यादी यांच्या जागेत परवानगीशिवाय बेकायदेशीर प्रवेश केला. तसेच सुरू असलेल्या बांधकामास प्रतिबंध करून फिर्यादी व त्यांच्या भावास शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.