विद्यार्थ्यांच्या अंगी कला गुण वाढवण्यासाठी बालकुमार साहित्य संमेलन - डॉ. दिलीप गरुड ; लोकमंगल हायस्कूल येथे सतरावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात

by Team Satara Today | published on : 12 December 2025


सातारा : विद्यार्थ्यांच्या अंगी आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम शाळा करते त्यांच्या अंगी कला गुण वाढवण्यासाठी मराठी बालकुमार साहित्य संमेलनआयोजित केली जावीत असे प्रतिपादन डॉ.दिलीप गरुड कार्यवाह अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांनी केले.

 सातारा औद्योगिक वसाहती मधील लोकमंगल हायस्कूल एम.आय.डी.सी सातारा येथे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा व लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने आयोजित सतरावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिलीप गरुड यांची उपस्थिती होती. संमेलनाध्यक्ष पद दस्तगीर शेख माजी विद्यार्थी व उपशिक्षक संजय भैरवनाथ काळे विद्यालय तासगाव यांनी भूषवले, यावेळी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. शिल्पा चिटणीस अध्यक्षा, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा तसेच शशिकांत जमदाडे कोशाध्यक्ष, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, विद्या बाबर, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

 गरुड पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपले कला गुण दाखवल्यास ते उत्तुंग भरारी घेऊ शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. अभ्यास बरोबर वाचन, लेखन याचीही आवड जोपासली पाहिजे. 

संमेलनाध्यक्ष दस्तगीर शेख म्हणाले आजकालच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले पाहिजे . शिक्षण प्राप्त केल्यास आपण यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात ओळखले जातो. जे विद्यार्थी अभ्यासाचा कंटाळा करतात ते भविष्यात काही बनू शकत नाहीत, यासाठी आपल्या कलागुणांना नेहमी वाव दिला पाहिजे. विद्यार्थी विविध स्पर्धेत चमकले तर शाळा मोठी होत असते यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे. 

शिरीष चिटणीस म्हणाले विद्यार्थ्यांच्या साठी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था नेहमीच काम करत आली आहे .विद्यार्थी मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असले पाहिजे, शाळेतून संमेलनाचे आयोजन होते त्यातून आपल्या आयुष्य बदलून जाते विद्यार्थ्यांची प्रतिभा निर्माण करण्याचे काम शाळा करते. ज्यामध्ये आपणास आवड आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले करिअर करावे. शाळा ज्ञान देत असते सर्व गुण संपन्न होण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले जातात. 

शिल्पा चिटणीस यांनी आपल्या प्रास्ताविकात मनोरंजनातून स्फूर्ती मिळते, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, उपजत गुण ओळखून ते वाढवले जावेत यासाठी मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन होत असते. या संमेलनात कविता गायन, लेखन, नृत्य हे सादर केले जातात यासाठी शिक्षक नेहमीच प्रोत्साहन देतात. 

संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली यावेळी मराठी विषयाचे हस्तलिखित प्रेरणा, व विज्ञान विषयाच्या माझे विज्ञान विश्व याचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. बालकुमार साहित्य संमेलनात मला आवडलेले पुस्तक, कथाकथन, गप्पागोष्टी, नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली. 

कार्यक्रमास उदय जाधव, गुलाब पठाण, काकासो निकम, संगीता कुंभार, भास्कर जाधव, प्रतिभा वाघमोडे, बाळकृष्ण इंगळे, यश शिलवंत, देवराम राऊत, सतीश पवार, चंद्रकांत देवगड, विजय गव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनन्या शिंदे, प्राची खंडागळे, वैशाली वाडीले यांनी केले.  उपस्थितांचे आभार विजय यादव यांनी मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या साळींदराचे वाचविले प्राण; वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले
पुढील बातमी
आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एमएमआरडीए आणि ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रकल्प उभारणार

संबंधित बातम्या