आमिर खानच्या बहुप्रतिक्षित ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरशी संबंधित एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यानंतर चाहते चित्रपटाबद्दल आणखी उत्सुक झाले आहेत. आता चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा लोक करत आहेत. या चित्रपटामध्ये अनेक नवनवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत.
‘सितारे जमीन पर’ च्या ट्रेलरची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता चाहत्यांना खूश करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर जाहीर केला आहे. आमिर खान प्रॉडक्शनने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे की चित्रपटाचा ट्रेलर आज रात्री प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी माहिती दिली की, हा ट्रेलर आज रात्री म्हणजेच १३ मे रोजी झी नेटवर्क वाहिन्यांवर संध्याकाळी ७:५० ते ८:१० वाजता आणि आमिर खान प्रॉडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर रात्री ८:२० वाजता प्रदर्शित केला जाणार आहे.
याआधी ५ मे रोजी ‘सितार जमीन पर’चे पहिले पोस्टर रिलीज झाले होते. पोस्टरमध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट दिसत होती आणि आमिर खानचा एक अद्भुत फोटोही दिसत होता. पोस्टरवर लिहिले आहे ‘सितारे जमीन पर’… सबका अपना अपना नॉर्मल’. असे पोस्टरवर लिहिलेले दिसत आहे. तसेच हे पोस्टर पाहून चाहत्यांना खूप आवडला आणि त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.
सितारे जमीन पर हा आमिर खानच्या 2007 मधील सुपरहिट चित्रपट तारे जमीन परचा सिक्वेल आहे. हा चित्रपट २० जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया डिसूझा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तथापि, चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये ती दिसली नाही. तसेच प्रेक्षक आता चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.