मराठा बिझनेसमन फोरमतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते व नगरसेवकांचा जाहीर सत्कार

by Team Satara Today | published on : 31 December 2025


सातारा  :  मराठा बिझनेसमन फोरम (एमबीएफ) सातारा तर्फे सातारा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सोमवारी सातारा बिझनेस सेंटरच्या सेलिब्रेशन हॉलमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी एमबीएफ चे सल्लागार मनोज देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले. एमबीएफचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित सदस्यांकडून सातारा शहराच्या विकासासाठी विविध उपाय योजनांवर भर द्यावा तसेच सातारा शहरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ते निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते, नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. डी . जी. बनकर, श्री निशांत पाटील, श्री जयवंत भोसले, श्री धनंजय जांभळे, श्री. अविनाश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व सातार्‍याच्या विकासासाठी आम्ही निवडून आलेले सर्वजण कटीबध्द राहू अशी यावेळी ग्वाही दिली. एकाच व्यासपीठावर एकाचवेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा होत असलेल्याची ही पहिलीच घटना असल्याचे बऱ्याच नगरसेवकांनी आपल्या मनोगतात बोलून दाखवले.

नवनिर्वाचित सदस्यांचा एमबीएफचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष जगदीश शिर्के, सल्लागार मनोज देशमुख, खजिनदार श्रीकृष्ण तुपे व एमबीएफचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. सदर कार्यक्रमास सातारा शहरातील मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनचे पदाधिकारी, हॉटेल संघटनेचे पदाधिकारी तसेच सातार्‍यात विविध क्षेत्रात काम करणारे उद्योजक, बांधकाम व्यवसायिक , समाजसेवक व एम बी एफ चे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री जगदीश शिर्के यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात महेश करचे यांचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा
पुढील बातमी
संग्राम निकाळजे यांच्या 'लोकल टू ग्लोबल' पुस्तकाचे साहित्य संमेलनात प्रकाशन

संबंधित बातम्या