सातारा : तालुका पोलिसांना स्विफ्ट गाडीमध्ये देशी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार तालुका पोलिसांनी महादरे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला. यावेळी दरेखुर्द गावच्या हद्दीत ओढ्याजवळ एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी आढळून आली. त्यामध्ये तपासणी केली असता एका बॉक्समध्ये देशी दारूच्या 90 मिलीच्या 800 वाटल्या पोलिसांना आढळून आल्या. तसेच विदेशी दारूच्या 48 बाटल्या आढळून आल्या. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) नुसार श्रीकांत रवींद्र पवार (वय 40 रा. 66 केसरकर कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकूण तीन लाख 89 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा; तीन लाख 89 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
by Team Satara Today | published on : 30 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा