01:19pm | Sep 04, 2024 |
नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली आहे. ती कधी येईल याची काही शाश्वती नाही. तिच्या येण्याची कोणतीही फिक्स डेडलाईन देण्यात आलेली नाही. फक्त सुनीता लवकर येईल एवढंच सांगितलं जात आहे. त्यामुळे तिची सर्व जगाला काळजी लागली आहे. असं असतानाच आणखी एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हणजे अंतराळात सुनीताच्या स्पेसक्राफ्टमधून हुर्र-हुर्र, हम्म- हम्म असा आवाज येत आहे. त्यामुळे सर्वांची भीतीने गाळण उडाली आहे. मात्र नासानेच आता यावर खुलासा केला आहे.
अंतराळातून जो आवाज येत आहे, असं वाटतंय जणू काही कोणी तरी दिर्घ श्वास घेत आहे. एअरक्राफ्टमधून हा आवाज येत आहे. या एअरक्राफ्टमध्ये तिसरा कोणी आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. नासाने हा असामान्य वाटणारा आवाज ऑडिओ कॉन्फिगरेशनची समस्या असल्याचं म्हटलं आहे. ही असामान्य घटना नाहीये. सुनीताने जे आवाज रेकॉर्ड केले ते धोकादायक नाहीत, असं नासाने स्पष्ट केलं आहे. सुनीताने अंतराळातून हे आवाज रेकॉर्ड करून पाठवले होते. त्यानंतर नासाने याचा अभ्यास करून खुलासा केला आहे.
दरम्यान, सुनीताने तिच्या आईला अंतराळातून एक मेसेज पाठवला आहे. आपण लवकरच पृथ्वीवर येणार आहोत. सुरक्षित येणार आहोत, असं सुनीताने या मेसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच आईला कोणतीही काळजी करू नको म्हणून सांगितलं आहे. सुनीताच्या या मेसेजने तिची आईच नव्हे तर अख्खं जग गहीवरून गेलं आहे. सुनीता विल्यम्सची आई बोनी पंड्या यांनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सुनीताचा मेसेज सांगितला. सुनीताने काळजी करू नकोस म्हणून सांगितलं. अंतराळात तुला अधिक काळ राहावं लागणार आहे, असं बोनी यांनी सुनीताला सांगितलं. तेव्हा, मी अंतराळवीर झाले तेव्हापासून तिसऱ्यांदा मी अंतराळात गेले आहेत. काही समस्या आल्या आहेत. पण ही काही मोठी समस्या आहे, असं आम्हाला वाटत नाही. आम्ही सुरक्षित परतू एवढंच नासा पाहत आहे. त्यामुळेच आम्ही काही काळ अधिक अंतराळात राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं सुनीताने म्हटल्याचं बोनी यांनी सांगितलं. दोन्ही अंतराळवीरांना 2025 पर्यंत अंतराळात राहावं लागेल. सुनीता आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगनद्वारे परत येतील, असं नासाने अधिकृत निवेदनात म्हटलं होतं.
एका मुलाखतीत बोनी यांनी नासाकडून घेत असलेल्या खबरदारीच्या उपयांवर समाधान व्यक्त केलं. इमानदारीने सांगायचं तर सुनीताला आणण्यासाठी कोणतीच घाई केली जात नाहीये, यावर माझं समाधान आहे. आधीच दोन शटल दुर्घटनाग्रस्त झाले आहे. माझी मुलगी किंवा इतर कुणाबरोबर असं परत व्हावं असं मला नाही वाटत. त्यामुळे खेद व्यक्त करण्यापेक्षा सुरक्षित राहणं कितीही चांगलं असं मला वाटतंय, असं बोनी म्हणाल्या होत्या. तर, मिशनचा कालावधी वाढला असला तरी सुनीता एका चांगल्या ठिकाणी आणि सुरक्षित आहे, हे महत्त्वाचं आहे, असं सुनीताचा पती डॅनियल यांनी म्हटलं आहे.
सुनीता विल्यम्स तिचा सहकारी बुच विल्मोर याच्यासोबत जूनमध्ये बोइंग स्टारलाइनरने अंतराळात गेली होती. केवळ एक आठवड्यासाठी हे दोघेही अंतराळात गेले होते. पण हिलीयम लीक झाल्याने आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा हवाई प्रवास आता अनेक महिन्यांसाठी वाढला आहे. त्यांना वर्षभर अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला राहावं लागणार आहे. त्यामुळे सर्वांनाच तिची चिंता वाटू लागली आहे.
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू |
शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन |
शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव |
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड |
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |