सातारा : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज एक रक्कमी भरणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एक रक्कमी परतावा योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाच्या व्यवस्थापक आर.के. दरेकर यांनी दिली आहे.
महामंडळाच्या थकबाकीदार लार्थींनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या सातारा जिल्हा कार्यालयाशी किंवा दूरध्वनी क्र. 02162-295184 संपर्क साधावा.