अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयाला टाळे ठोकणार- सचिन मोहिते यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

by Team Satara Today | published on : 30 December 2025




सातारा : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कारभारामध्ये अनियमितता सुरू झाली आहे. अनेक प्रस्तावांचे एल वाय नाकारण्यात येत असून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेनासा झाला आहे. हे प्रकार मराठा उद्योजकांसाठी अत्यंत त्रासदायक आहेत. या महामंडळाचा कारभार सुधारण्यात यावा अन्यथा या महामंडळाच्या सदर बाजार येथील कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे. 

जिल्हा प्रशासनाला आज त्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले .यावेळी सुनील पवार सागर रायते रुपेश वंजारी, रवी भणगे, इमरान बागवान, अक्षय वाघमारे, अभिजीत बनसोडे, चंदन कदम, अमर देते इत्यादी यावेळी उपस्थित होते .


या निवेदनात नमूद आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळ हे मराठा उद्योजकांच्या कल्याणासाठी चालू करण्यात आले होते. या महामंडळाच्या अंतर्गत चालू असणाऱ्या अनेक योजनांच्या कामांमध्ये अनियमितता दिसून येत आहे ट्रॅक्टर साठी कर्ज वाटप वाहनासाठी कर्जवाटप व्याज परतावा अशा अनेक योजना बंद करण्यात आल्या आहेत . .महामंडळाचे चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापक यांच्यामध्ये सुसंवाद नसल्याने लाभार्थ्यांमध्ये वेगळाच संदेश जात आहे .आर्थिक परिस्थितीमुळे पिचलेल्या मराठा समाजाला कुठेतरी व्यवसायाची संधी निर्माण होत असताना या महामंडळाला ग्रहण लागले की काय असे चित्र निर्माण झाले आहे. मराठा समाजाच्या योजनांना हरताळ फासणाऱ्या या महामंडळाला सरकार बंद करणार की काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून योग्य तो अहवाल जनतेसमोर यावा अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने महामंडळाला टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारचे शासकीय नुकसान झाल्यास त्याला महामंडळाचे पदाधिकारी जबाबदार असतील,  असा इशारा मोहिते यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; ध्वज स्तंभावर चढलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले
पुढील बातमी
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वांना खुला प्रवेश; सातारकर, साहित्यप्रेमी, विद्यार्थ्यांसह सर्वांनी खुल्या मनाने यावे

संबंधित बातम्या