सातारा : नागेवाडी, ता. सातारा येथे दि. २२ रोजी चार जणांनी एका मुलाला व १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुलाला जीवे मारण्याची धमकी देत बायडाबाई कळकुंबे, गणेश कळकुंबे (रा. कासेगाव, पंढरपूर) तसेच भास्कर व मनीषा दांडगे (रा. रांझणी, पंढरपूर) यांनी दोघांना जबरदस्तीने गाडीत बसवले.
पंढरपूर-कासेगाव मार्गावर मुलाला रस्त्यात सोडून देत संशयित आरोपींनी १३ वर्षीय मुलीसोबत पलायन झाले. घटनेची नोंद पंढरपूर पोलीस ठाण्यात झाली असून गुन्हा सातारा तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.