सातारा : ऑपरेशन सिंदुर मध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्या प्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने बुधवारी २१ मे रोजी जय हिंद यात्रा काढण्यात आली.या जयहिंद यात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अल्पना यादव, राजेंद्र शेलार, अजित पाटील चिखलीकर, झाकीर पठाण, रजनीताई पवार, बाबासाहेब कदम, रफिकशेठ बागवान, अमरजित कांबळे, प्रताप देशमुख, संजय तडाखे, जगन्नाथ कुंभार, निवास थोरात, मनोहर शिंदे, ऍड. श्रीकांत चव्हाण, ऍड. दत्तात्रय धनावडे, अन्वर पाशा खान, मनोज तपासे, संदीप माने, सर्फराज बागवान, कल्याण पिसाळ, अमर करंजे, प्रकाश फरांदे, अरबाज शेख, सुरेश इंगवले आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पेहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय पर्यटक यांची हत्या केली होती. या हल्याचा बदला भारतीय सैनिकांनी घेऊन सिन्दुर ऑपरेशन यशस्वी केले. म्हणून सर्व भारतीय सैन्य दलाला सलाम करण्यासाठी व निष्पाप भारतीय पर्यटक यांचे प्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली जयहिंद यात्रा काँग्रेस भवन ते हुतात्मा स्मारक (भू-विकास बँक) ते काँग्रेस भवन अशी काढण्यात आली. या यात्रेमध्ये देशाच्या जवानांचे मनोधर्या वाढवण्यासाठी "जरा याद करो कुर्बानी” जय जवान" " भारतीय सैन्यदलाचा विजय असो" अशा घोषणा देऊन सैन्य दला प्रति सद्भावना व्यक्त करण्यात आल्या.या जय हिंद यात्रेत जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
सातारा शहरात काँग्रेसची जयहिंद रॅली
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण सहभागी
by Team Satara Today | published on : 21 May 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026
४० हजार रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
January 16, 2026
सातारा एमआयडीसी व यशोदानगर येथून दुचाकी वाहनांची चोरी
January 16, 2026