सातारा : सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी कारवाई करत जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील विशाल पान शॉपच्या टपरीच्या आडोशाला जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. ३० रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी ६२० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी प्रवीण दत्तात्रय जगताप (वय २८, रा. मंगळवार पेठ, सातारा) तसेच जुगार अड्डा चालवणारा अमीर इम्तियाज मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संतोष घाडगे करत आहेत.