सातारा : सातारा जिल्ह्यातील काही सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जिल्हा बाहेर झाल्या असून याबाबतचे आदेश पोलीस मुख्यालयाला नुकतेच प्राप्त झाले .संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले असून याबाबतची कार्यवाही पोलीस मुख्यालयाकडून होत आहे.
पोलीस अधीक्षकांचे रीडर सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांची मुंबई शहर येथे बदली झाली असून अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे रीडर एपीआय वाय. के. धनवे यांची मुंबई फोर्स वनला बदली झाली आहे.
पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांची पोलीस मुख्यालयातून फलटण ग्रामीण येथे तर तेथील पोलीस निरीक्षक हेमंत शहा यांची आर्थिक गुन्हे शाखा येथे बदली झाली आहे. यापूर्वीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय. के. चौधरी यांची नागपूर शहरला बदली झाली आहे. गेली अडीच वर्ष सातारा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचा कार्यभार सांभाळणारे श्याम काळे यांची सीआयडी पुणे येथे पदोन्नतीवर बदली झाली आहे. भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांना मुंबईत बदली देण्यात आली होती मात्र, विनंती अर्जामुळे त्यांना पदोन्नतीवर सातारा पोलीस मुख्यालयात सायबर सेलचा चार्ज देण्यात आला आहे. मेढा येथील पोलीस ठाण्याचे पृथ्वीराज साठे यांची भुईंज येथे बदली करण्यात आली आहे.