सातारा : सातारा जिल्ह्यातील दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जाहीर होतील त्या निमित्ताने राजकीय वर्तुळामध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याविषयीची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यात प्रचंड ताकद लावल्याने त्यांची प्रतिष्ठापणा लागली आहे तर महाविकास आघाडीचे सुद्धा या लढतींकडे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जिल्ह्यातील दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकूण 701 कर्मचारी तैनात करण्यात आले असून सातारा शहरासाठी 196 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सातारा शहरातील 156 मतदान केंद्रावर दोन नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. जिल्ह्यातील 233 जागांसाठी 625 कर्मचाऱ्यांचे भवितव्य मशीन बंद झाले होते .दिनांक 20 रोजी फलटण व महाबळेश्वर येथे उत्साहाने मतदान झाले काही कारणास्तव या दोन नगरपालिकांची निवडणूक लांबीवर पडली होती तेथे राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि फलटणमध्ये राजे गटविरुद्ध भाजप असा दुरंगी सामना रंगला त्यामुळे ही राजकीय समीकरणे कोणती वळण घेणार याची आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
साताऱ्यात प्रांत आशिष बारकुल यांनी गुरुवारी येथील वखार महामंडळामध्ये मतमोजणीची रंगीत तालीम घेतली 196 कर्मचाऱ्यांना येथील गोडाऊन मध्ये साडेनऊ वाजता निमंत्रित करण्यात आल्या असून एकूण 16 टेबलांवर सर्व मशीन ठेवण्यात येणार असून सर्वांसमक्ष या मशीनचे सील काढण्यात येणार आहेत. बूथनिहाय पहिल्या तीन प्रभागाचे निकाल पहिल्या अर्ध्या तासात जाहीर होतील त्यामुळे कार्यकर्त्यांनी गुलालाची पोथी सातारा जाणून ठेवली असून राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचले आहे. सातारा शहरात शहर व शाहूपुरी पोलिसांनी सुद्धा गुलाल व्यावसायिक तसेच डीजे व्यावसायिक यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कठोर सूचना दिले आहेत. तसेच कोणाकडूनही कायदा सुव्यवस्थेचा भंग होईल या पद्धतीचे वर्तन होऊ नये असे निर्देशित करण्यात आले आहे .वखार महामंडळाला सीआरपीएफ तुकडी तसेच शंभर पोलीस कर्मचाऱ्यांचा तकडा बंदोबस्त उपलब्ध असून परिसराला कलम 144 लागू करण्यात आले आहे.
साताऱ्यात अपक्षांनी वाढवले म्हणून मनोमिलनाचे टेन्शन
साताऱ्यात काही प्रभागांमध्ये अपक्ष बाजी मारतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक धक्कादायक निकालांची नोंद होईल असे दिसून येत आहे.नगराध्यक्ष पदासाठी अमोल मोहिते विरुद्ध सुवर्णाताई पाटील अशी लढत होत असून यामध्ये अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चांगली लढत देतील असा अंदाज आहे. त्यांच्या मत विभागणीचा फटका प्रमुख दोन उमेदवारांचे मताधिक्य कमी करू शकतो यामुळे मशाल की तुतारी या प्रश्नांची जोरदार चर्चा आहे.अपक्ष उमेदवारांनी मनोमिलनाच्या उमेदवारांना तगडे आव्हान दिल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे.