सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चैतन्य माने व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी फायटरने मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी साहिल गणेेश येवले (वय 18, रा. सत्यमनगर, सातारा) या युवकाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 23 ऑक्टोबर रोजी कामाठीपुरा येथे घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.