मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 December 2024


सातारा : एकास मारहाण करुन जबरी चोरी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एमआयडीसीतील हॉटेल सिध्दीविनायक येथे एकाने तुझ्याकडे गांजा आहे काअसे विचारले. तेव्हा संबंधिताने नाही, असे उत्तर दिल्याने संशयिताने मारहाण केली. तसेच मोबाईल चोरुन नेला. ही घटना दि. 18 रोजी घडली. खटाव स्टील प्रा. लि. मधील कर्मचारी बिशुमुंड सुरजा मुंडा (वय 40) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, प्रशांत किर्ती कुडाव (रा. कोडोली, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार भिसे तपास करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल
पुढील बातमी
ढकलून दिल्याने एकजण जखमी

संबंधित बातम्या