जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 25 June 2025


सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोन जणांवर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी बॉम्बे रेस्टॉरंट ते कोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या काटकर वडापाव सेंटरच्या आडोशाला अभिषेक प्रकाश मनोरे रा. कोडोली, सातारा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 450 रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत, सातारा शहरातील 501 पाटी जवळील जयहिंद रिक्षा स्टॉप च्या आडोशाला समीर इनुस मुल्ला रा. शनिवार पेठ, सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 620 रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
पुढील बातमी
विषारी औषध प्राशन करून महिलेची आत्महत्या

संबंधित बातम्या