वाघेरीत राजकीय विरोधातून तुंबळ मारामारी; परस्परविरोधी फिर्यादी; सातजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 01 November 2025


कराड :  वाघेरी, ता. कराड येथे शेतजमीन खरेदी आणि राजकीय विरोधातून तुंबळ मारामारी झाली. कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून तेराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुबेर मन्सूर पटेल (वय 35, रा. वाघेरी, ता. कराड) यानी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, शेतजमीन खरेदी केल्याचा तसेच निवडणुकीला उभे राहणार आहे या गोष्टीचा राग मनात धरून मज्जिद फातुलाल पटेल याने त्याच्या हातातील लोखंडी पाइपने माझ्या डोक्यात, पाठीमागील बाजूस मारून जखमी केले. शोएब मज्जिद पटेल याने भाऊ अझरुद्दीन याच्या डोक्यात व कानावर कोयत्याने वार केला. तबरेज तय्यब पटेल, जावेद इसन पटेल, हज्जुअली गुलाम पटेल यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. इम्तियाज हसन पटेल याने सदर ठिकाणी येवून यांना जिवंत सोडू नका, असे म्हणून दमदाटी केली. मज्जिद फातुलाल पटेल याने त्याचा मुलगा शोएब याने अझरुद्दीन यास निवडणूकीला कसा उभा राहतो तेच बघूया, तु त्याला खलास करून टाक, अशी चेतावणी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तर तबरेज तय्युब पटेल याने दिलेल्या फिर्यादीनुसार, नुर इसाक पटेल, अझरुद्दीन मन्सुर पटेल, जुबेर मन्सुर पटेल, इम्रान चांद पटेल, अन्वर रशिद मुल्ला, अबुरेहान इम्राण पटेल, नवाब नुर पटेल यांनी मला तु युवराज अशोक पाटील व मोहम्मद पटेल यांच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये तोंड घालु नकोस, असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शोएब मज्जीद पटेल, हाज्जुअली गुलाम पटेल, जावेद हसन पटेल, सरपंच मज्जीद फतुलाल पटेल हे भांडणे सोडविण्यास आले असता त्यांनाही नुर इसाक पटेल, अझरुद्दीन मन्सुर पटेल, जुबेर मन्सुर पटेल, इम्राण चांद पटेल, अन्वर रशिद मुल्ला, अबुरेहान इम्रान पटेल, नवाब नुर पटेल यांनी संगनमत करुन मारहाण केली. नुर इसाक पटेल, जुबेर मन्सुर पटेल यांनी तेथे पडलेले लाकडी दांडके हातात घेवुन माझ्या डोक्यात, डाव्या हातावर, कमरेवर मारुन मला जखमी केले. त्यानंतर त्यांनीच लाकडी दांडक्याने शोएब मज्जीद पटेल याच्या डाव्या हातावर व डाव्या पायावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यास जखमी केले, असे म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुंडाराज विरोधी संयुक्त मोर्चाची सह्यांची मोहीम; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी
पुढील बातमी
महाबळेश्वर तालुक्यातील मधाचे गांव मांघर येथील मधपाळांना सोमवारी होणार मधपेट्या वाटप

संबंधित बातम्या