सचिन आणि लक्ष्याची बैलजोडी ठरली 'श्री सेवागिरी हिंदकेसरी'; २ लाख ७८ रुपयांचे रोख बक्षीस जिंकून किताब पटकावला, रेकॉर्डब्रेक गर्दी; पारदर्शक निकाल

by Team Satara Today | published on : 17 December 2025


पुसेगाव  :  महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लाखो बैलगाडी शर्यत शौकीनांचे आकर्षण असलेल्या श्री सेवागिरी यात्रोत्सवानिमित आयोजीत 'श्री सेवागिरी हिंदकेसरी' बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यामध्ये शाहिद भाई मुलाणी नातेपुते यांचा आदत किंग  सचिन "आणि आंबेगाव सांगलीच्या श्रीनाथ ज्वेलर्सचा  "लक्ष्या"या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे २ लाख ७८ रुपयांचे रोख बक्षीस जिंकून 'श्री सेवागिरी हिंदकेसरी'चा किताब पटकावला. 

येथील दहिवडी रोड बैल बाजाराजवळील मैदानात सकाळी साडे सहा वाजता मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष वाघ विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या उपस्थितीत मानाचा नारळ फोडून पहिला फेरा सुरू झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो बैलगाडी शर्यत शौकिनानी केलेल्या गर्दीने मैदान फुलून गेले होते.

 विजयी गाडी मालकांची नावे पुढीलप्रमाणे : २) भद्रा मारुती प्रसन्न संभाजीनगर यांचा लखन आणि कै पंढरीनाथ फडके यांचा सर्जा ३) जय हनुमान प्रसन्न देवीखिंडी चा बावरा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर ४) गोपीनाथ शेठ कर्जत गोविंदा आणि वसंत चव्हाण जालना यांचा बलमा ५) खानविलकर कळंबोली आणि अरविंद सामठाणे सिन्नर यांची बैलजोडी ६) तुषार पैलवान म्हसुर्णे यांचा शंभू आणी बाजीराव पाटील यांचा सोन्या तर ७ वा क्रमांक स्व किशोर पाटील यांचा रामा आणि कुमठे येथील दत्तात्रय जगदाळे यांच्या बैलजोडीने पटकावला . मैदानात एकापेक्षा एक वरचढ जातिवंत खिल्लार आणि म्हैसुर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या शर्यतीचा थरार प्रेक्षकांना अनुभवायास मिळाला. स्पर्धेतील प्रत्येक फेरा चुरशीचा होऊन स्पर्धा उत्कंठावर्धक झाली. अचूक निकाल पाहण्यासाठी ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरे तैनात करण्यात आले होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशभरात पदव्युत्तर वैद्यकीयच्या 4 हजार नव्या जागांना मान्यता; राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता; महाराष्ट्रात 181 नव्या जागा
पुढील बातमी
संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ

संबंधित बातम्या