सातारा : सातारा शहरात विलासपूर,गोडोली येथे राहणाऱ्या ५७ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल ६१ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि २० जुलै ते ऑगस्ट २०२५ दरम्यान फिर्यादी जावेद मेहबूब शेख (वय ५७, रा. बापूजी साळुंखेनगर,विलासपूर, गोडोली,सातारा) यांची एच ००९- Munoth Insight Clubmunoth या व्हाट्सऍप ग्रुपमधील वेगवेगळ्या ६ मोबाईल क्रमांकावरून व्हाट्स ऍप कॉलद्वारे फोन करून लिंक पाठवण्यात आली. लिंकवर क्लिक करण्यास सांगून ती ओपन करण्यास सांगितले. यावेळी वेळोवेळी त्यांच्याकडून तब्बल ६१ लाख २५ हजार रुपये रकमेची फसवणूक करण्यात आली. याबाबतची फिर्याद शहर पोलिसांत दाखल करण्यात आली असून अधिक तपास सहायक बिल्ले करत आहेत.