आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक किंवा वेळेअभावी दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम विविध गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. काही जण अनेक आजारांची सुरूवातीच्या लक्षणांकडे इतकं लक्ष देत नाहीत. मात्र नंतर हीच लक्षणं गंभीर रुप धारण करतात. जे खूप महागात पडू शकते. हल्ली भारतातच नव्हे तर जगभरात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. आज अशा काही लक्षणांबद्दल जाणून घेऊया जे हृदयविकाराचा झटक्याची सुरूवातीची लक्षणं मानली जातात. ही लक्षणे लवकर ओळखून, आपण वेळेवर वैद्यकीय मदत घेऊ शकता.
व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात
लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे की, तणाव, अस्वस्थ झोपेच्या सवयी आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. कामाच्या ताणतणावात आपण आपले स्वार्थ विसरलो आहोत. अधिक मिळवण्याच्या आपल्या इच्छेमध्ये, आपल्याला रात्री पुरेशी झोप लागत नाही किंवा आपण आपल्या आहाराची काळजी घेत नाही. या कारणांमुळे हृदयविकाराचा झटका, कार्डियाक अरेस्ट, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोक यासारख्या हृदयविकारांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
हृदयविकाराचा झटका का येतो?
अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की हृदयविकाराचा झटका का येतो? आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार हृदयविकाराचा झटका ही घातक स्थिती असू शकते. जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणारी धमनी ब्लॉक होते, तेव्हा असे होते. त्यामुळे हृदयात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन हृदयाचे स्नायू मृत व्हायला लागतात. स्नायू नीट काम करत नसल्यामुळे हृदय रक्त पंप करू शकत नाही आणि हृदयविकाराचा झटका येतो.
हृदयविकाराची लक्षणं वेळीच ओळखा..
स्नायूंमध्ये पेटके- काही लोकांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी त्यांच्या पायात स्नायू पेटके येऊ शकतात, ज्यामुळे खूप वेदना होतात.
श्वास घेण्यात अडचण - श्वास घेण्यास त्रास होणे, अगदी विश्रांती घेत असताना देखील असे होणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे - अचानक चक्कर येणे किंवा मूर्च्छा येणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित असू शकते.
छातीत दुखणे किंवा अस्वस्थता - हे सर्वात सामान्य लक्षण आहे, परंतु हे नेहमीच तीव्र असेल असे नाही. छातीत वेदना होणे, छातीत दाबल्यासारखे वाटू शकते. हे अनेकदा हात, खांदे, मान, जबडा किंवा पाठीवर पसरू शकते.
थकवा - अचानक किंवा असामान्य थकवा, विशेषत: जेव्हा तुम्ही सामान्य कामात गुंतले असताना असे घडणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. डोकेदुखी - कोणत्याही ठोस कारणाशिवाय डोकेदुखी हे देखील लक्षण असू शकते.
मळमळ किंवा उलट्या - काही लोकांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. घाम येणे - अचानक थंड घाम येणे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |