राज्यातील दुबार मतदारांच्या मुद्द्यावर आयोगाचे दुर्लक्ष : आ. शशिकांत शिंदे

by Team Satara Today | published on : 15 December 2025


अमरावती  :  राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करताना सुमारे ११ लाख मतदार दुबार असल्याची कबुली दिली आहे. या दुबार मतदारांवर आमचा सुरुवातीपासूनच आक्षेप होता आणि आहे. त्यांची सखोल पडताळणी करून नावे रद्द करण्याची मागणी वारंवार करण्यात आली; मात्र राज्य निवडणूक आयोगाने या गंभीर मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. सत्तेची मस्ती चढलेल्या सरकारला आणि लोकशाही मूल्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांना जागा दाखविण्यासाठी सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकशाही आजही जिवंत आहे, हे दाखविण्यासाठी मतपेटीतून क्रांती घडविण्याची हीच वेळ आहे, असे सांगत त्यांनी मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैध गुटख्या संदर्भात रक्षक प्रतिष्ठानचे पोलिसांना निवेदन; तात्काळ कारवाई करण्याची केली मागणी
पुढील बातमी
झाडाणी प्रकरणाची सुनावणी पूर्ण - सुशांत मोरे; अहवाल शासनाकडे पाठवणार

संबंधित बातम्या