‘गुरुकुलची दिंडी’ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दिशादर्शक : जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 04 July 2025


सातारा : शाहुनगर सातारा येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटी संचलित गुरूकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, नामदेव तुकारामच्या गजरात हातात भगव्या पताका, भालदार, चोपदार, डोक्यावर तुळशी वृंदावन, आकर्षक रांगोळी झिम्मा-फुगडीचा फेर, मृदुंग, तुतारीचा निनाद, भव्य गजराजाची प्रतिमा, आकर्षक रथ, घोडयाचे आकर्षक रिंगण विद्यार्थ्यांचा पारंपारिक पेहराव यामुळे गुरूकुलच्या दिंडीने उपस्थित नागरिक व पालक यांची वाहवा मिळवली.

सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने गुरूकुल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या दिंडीचा शुभारंभ गांधी मैदान राजवाडा येथून माउलींच्या पालखीचे पूजन संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून दिंडीस सुरूवात करण्यात आली. 

यावेळी गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र चोरगे, सौ. कविता चोरगे, सचिव आनंद गुरव, अॅड. ऐश्वर्या चोरगे, अर्जुन चोरगे माध्यामिक विभाग मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी श्री. विश्वनाथ फरांदे, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

सदर दिंडी गांधी मैदान राजवाडा मार्गे कमानी हौद, शेटे चौक येथून मोती चौक अशी आयोजित करण्यात आली होती. यावेळी दिंडीमध्ये भव्य गजराजाची प्रतिमा व गांधी मैदान येथील विद्यार्थ्यांचे गोल रिंगण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विदयार्थीनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन, विद्यार्थ्यांनी हातात भगवी पताका, टाळ मृदुंग, विद्याथ्र्यांची आकर्षक वेशभूषा तसेच नामदेव, तुकारामांचा जयघोषामुळे या शिस्तबध्दरित्या दिडींची शोभा वाढली होती. दिंडीच्या मार्गावर सुबक आखीव रेखीव रांगोळीमुळे उत्साही वातावरण तयार झाले होते यामुळे  दिंडीची शोभा वाढली. सदर दिंडीमध्ये एनसीसी चे विद्यार्थी व बॅड पथक यांनी उत्कृष्टरीत्या संचलन केले तसेच  जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना NCC पथकाने सलामी दिली.

यावेळी बोलताना संतोष पाटील म्हणाले की, दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासोबत अध्यात्मिक परंपराची ओळख व त्याचे महत्व कळण्याच्या दृष्टीने या दिंडीचे आयोजन खरोखरच उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांच्या दिंडीतील उत्साहामुळे मिळाला वारीचा अनुभव अनुभवता आला. गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची चौफेर प्रगती होत आहे. विदयार्थी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच इतरही क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत.

यावेळी बोलताना राजेंद्र चोरगे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या दिंडीच्या माध्यामातून आम्ही विद्यार्थ्यांना संत परंपरा व त्याचे सामाजिक योगदान यांची माहिती व महात्म्य समजवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो.

यावेळी मधुकर जाधव, उदय गुजर, संजय कदम, जगदिश खंडेलवाल, नितीन माने, दिपक मेथा, राजेंद्र खंडेलवाल, अंबाजी देसाई, हरिदास साळुंखे, विजय पवार, संतोष शेंडे, जगदीप शिंदे, श्रावण पाटील उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरूकुलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,  गुरूकुल शाळेचे विदयार्थी, पालक, विद्यार्थी वाहतुक करणारे व्हॅन अंकल यांनी शिस्तबध्दरीत्या नियोजन केले होते. सातारकर नागरिक, वाहतुक नियंत्रण शाखेचे कर्मचारी, सातारा नगरपरिषद सातारा, शहर पोलीस सातारा, शाहूपुरी पोलीस सातारा, प्रतापसिंह हायस्कूल व पालक शिक्षक संघ यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. ललिता कारंडे यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चुकीची कागदपत्रे सादर करणार्‍यांवर कारवाई
पुढील बातमी
पवन कल्याण आणि बॉबी देओलची जबरदस्त केमिस्ट्री

संबंधित बातम्या