दारू विक्रेत्यांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 08 November 2024


सातारा : सातारा शहरात अवैधरित्या दारुविक्री केल्याप्रकरणी दोनजणांवर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील आकाशवाणी झोपडपट्टी ते महानुभव मठाकडे जाणार्‍या रस्त्यावर समीर आबाजी कांबळे (वय 41, रा. कोंडवे, ता. सातारा) हा दि. 7 रोजी अवैधरीत्या दारुविक्री करताना आढळून आला. त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल सुमीत मोरे यांनी कारवाई केली असून, शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडून 1 हजार 750 रुपयांची दारु हस्तगत केली.

तसेच, विकासनगर येथे भीमा सुभाष बनसोडे (वय 37, रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा) हा दि. 7 रोजी अवैधरीत्या दारु विक्री करत होता. त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल सागर गायकवाड यांनी कारवाई करत 3 हजार 500 रुपयांची दारु जप्त केली. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे
पुढील बातमी
वीज चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या