सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी सध्या सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी असभ्यवर्तन केल्याप्रकरणी सुरज अशोक चव्हाण रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.