सातारा : सातारा बस स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर सात येथील सातारा आटपाडी बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पिशवीतील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले आहेत. याप्रकरणी माधुरी दादासाहेब पाटील वय59 राहणार पारसिक नगर, खारेगाव, कळवा, ठाणे. मूळ राहणार पाटील वस्ती, निंबवडे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 29 जुलै रोजी दुपारी एक वाजता सातारा बस स्थानकावर फलाट क्रमांक सात वरून गाडीत चढत असताना अज्ञात चोरट्याने माधुरी पाटील यांच्या पिशवीतील गर्दीचा फायदा घेऊन दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणाचा तपास हवालदार अनिल देशमुख करत आहेत.
सातारा बस स्थानकावर महिलेचे दागिने चोरीस
by Team Satara Today | published on : 12 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा