के. एस. डी. शानभाग विद्यालय सर्वोत्तम नाविन्यपूर्ण शाळा पुरस्काराने सन्मानित

by Team Satara Today | published on : 05 May 2025


सातारा : 5. मे ..अन्विक्षा 2025 वार्षिक विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. ज्ञानश्री टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सातारा आणि श्री. भाई वांगडे फाउंडेशन यांच्यातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सातारा येथील श्याम सुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस ट्रस्टच्या के एस.डी शानभाग विद्यालय व जुनियर कॉलेजला सर्वोत्तम नाविन्यपूर्ण शाळा हा विषय सन्मान प्रदान करण्यात आला.

ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. त्यामध्ये विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या गटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. चषक, प्रमाणपत्र व रोख ७००० रुपये असे या पारितोषकाचे स्वरूप होते. यात गटात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इशिता विशाल मोग्रा, रुद्र दत्ता खामकर, वेद राहुल रजपूत व दिव्यांश सागर राजगुडे यांनी सहभाग घेतला तसेच इयत्ता आठवी ते दहावी या गटात ओवी आशुतोष पार्टे व आरोही रणजीत यवतकर यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  बक्षीस स्वरूपात त्यांना चषक ,प्रमाणपत्र व रोप 4000 रुपये प्रदान करण्यात आले .या विद्यार्थ्यांना सौ. संध्या कवडे सौ.प्रियांका ताटे सौ.सुजाता रजपूत या विज्ञान शिक्षिका व पालकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


या यशाबद्दल शाळेचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग संचालिका सौ. आचल घोरपडे, सौ.उषा शानभाग, शाळेच्या प्राचार्य सौ .रेखा गायकवाड व मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
21 मे रोजी रिक्षाचालकांकडून राज्यव्यापी आंदोलन
पुढील बातमी
कश्मीरमध्ये पुन्हा हल्ल्याची तयारी?

संबंधित बातम्या