सातारा : खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 ते 28 मे दरम्यान विनायक चंद्रकांत माने रा. सत्यम नगर, खेड, सातारा यांची गाडी अडवून शिवीगाळ, दमदाटी करून अब्दुल इमाम सय्यद रा. ग्रीन सिटी अपार्टमेंट, शाहूनगर, गोडोली, सातारा याने माने यांच्याकडून दहा हजार रुपये याआधी घेतले होते. यानंतर पुन्हा माने यांना फोन करून मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. मोरे करीत आहेत. संबंधित अब्दुल सय्यद याला अटक करण्यात आली आहे.