सातारा : कारी येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे साडेचार तोळे वजनाचे मंगळसूत्र लंपास केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 ते 19 एप्रिल दरम्यान बाळू अंतू देशमुख रा. कारी, ता. सातारा सध्या रा. पनवेल, जि. रायगड यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचे 45 ग्रॅम ८१० मिली वजनाचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मंडले करीत आहेत.