जबरी चोरीप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 September 2024


सातारा : जबरी चोरीप्रकरणी पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दारु पिण्यासाठी पैसे देत नसल्याने पाच जणांनी मारहाण करत खिशातील 30 हजार रुपये काढून पळ काढला. हा प्रकार कोडोली, ता. सातारा येथे दि. 19 रोजी घडला. या प्रकरणी जितेंद्र लादमल शहा (वय 51, रा. कोडोली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अभिषेक गुलाब हावळे (वय 25, रा. कोडोली), रसिक अनिल धोत्रे (वय 22, रा. विलासपूर), जितेंद्र दीपक सुर्वे (वय 20, रा. कोडोली), निखिल काळे, तेजस संकपाळ (रा. कोडोली) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
पुढील बातमी
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या