सातारा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकावर पोस्कोचा गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा : सातारा तालुका परिसरात अल्पवयीन मुलीला घरी बोलावून  वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पीडितेच्या आईने दिली आहे.

जैद समीर मुलाणी (रा. सैदापूर ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिसेंबर २०२४ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान संशयित आरोपी जैद मुलाणी याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आणि ती विशिष्ट जातीची असल्याचे माहिती असताना देखील तिची इच्छा नसताना अत्याचार केले. डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे प्रकार वारंवार घडल्याचे  फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी पीडितेच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकता कॉलनी येथे तारेचे कंपाउंड करण्यास मज्जाव; दोघाजणांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यातील वाढत्या गुन्हेगारीवर विधान परिषदेत खडाजंगी; कोरेगाव पोलीस ठाण्याच्या चौकशीचे सरकारकडून आश्वासन

संबंधित बातम्या