सातारा भूषण पुरस्कारासाठी पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांची निवड

by Team Satara Today | published on : 14 November 2025


सातारा : रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा व नागरिकांतर्फे दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला,  संस्थेला  सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षीचा हा पुरस्कार पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. लवकरच एक भव्य कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या ट्रस्टचे विश्वस्त डॉ.अच्युत गोडबोले यांनी दिली.

स्वर्गीय अरुण गोडबोले यांनीच  जोशी यांच्या नावाची निवड केल्यामुळे हा पुरस्कार आवर्जून ज्येष्ठराज जोशी यांना प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठराज जोशी यांचा जन्म कराड तालुक्यातील मसूर येथे झाला असून त्यांचे शालेय शिक्षण कराड येथे पूर्ण झालेले आहे डॉक्टर जेष्ठराज जोशी यांनी डॉक्टर होमी भाभा इन्स्टिट्यूट ,मुंबई तसेच परदेशातील अनेक विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम केले आहे. 54 वर्षे संशोधन व अध्यापनाचे काम करणारे श्री .जोशी यांना सन 2014 साली पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारने गौरविलेले असून त्यांना याबरोबरच भटनागर पुरस्कार, उत्तम शिक्षक पुरस्कार आदी मान्यवर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. त्यांची 1000 हून अधिक संशोधनावरील विशेष पब्लिकेशन ही प्रकाशित करण्यात आली असून नवीन प्रकारच्या केमिकल व औद्योगिक इंजीनियरिंग मधील संशोधनासाठी त्यांनी केलेले संशोधन व अध्यापनाचे काम खरोखरच गौरवपूर्ण असे आहे जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेसाठी विशेष योगदान दिले असून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी ही त्यांनी केलेले कार्य हे गौरवपूर्ण असे आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
मराठा समाजातील उद्योजक उभे रहाताहेत हे पाहून भुजबळांच्या पोटात दुखतंय : नरेंद्र पाटील

संबंधित बातम्या