कास रोडवर थरारक स्‍टंटबाजी केल्‍याप्रकरणी दोन तरुणांवर गुन्‍हा दाखल; पोलिसांकडून कडक इशारा

by Team Satara Today | published on : 29 March 2026


सातारा : कास रोडवर पॉश कार नेवून तेथे जीवावर बेतणारे थरारक स्‍टंटबाजी केल्‍याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला. स्‍टंटबाजी केल्‍यानंतर त्‍याचा व्‍हिडीओ इन्‍स्‍टाग्रामवर व्‍हायरल करण्यात आला होता. 

साहिल निकम असे संबंधिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काही दिवसांपूर्वी दोन युवकांनी त्‍यांच्या महागड्या कार कास रोडवर नेल्‍या हाेत्‍या. तेथे रॅश ड्रायव्‍हिंग करत धुरळा उडवत जीवघेणे स्‍टंट केले. या सर्व घटनेचे संबंधितांनी व्‍हिडीओ करुन ते व्‍हिडीओ इन्‍स्‍टाग्राम या सोशल मिडीयावर व्‍हायरल केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी सर्व माहिती घेतली.

साहील निकम व प्रतीक शिंदे हे दोघे असल्‍याचे समोर आल्‍यानंतर पोलिसांनी त्‍यातील साहील निकम याच्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्‍हा दाखल केला. त्‍याच्या कारची ब्लॅक फिल्‍मींग काढण्यात आली. तसेच पुन्‍हा अशी स्‍टंटबाजी करणार नसल्‍याचे त्‍याच्याकडून बजावून घेण्यात आले. पोनि निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस किरण जगताप, मालोजी चव्‍हाण यांनी कारवाईत सहभाग घेतला.

कास पठारावर चारचाकी वाहनाने धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधित तरुणांनी वाहन चालवताना स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने स्टंट केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. 

या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक शिंदे आणि साहिल निकम यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच भविष्यात अशा प्रकारची स्टंटबाजी न करण्याचे त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेण्यात आले आहे. कास पठारासारख्या संवेदनशील पर्यटन स्थळी अशा प्रकारचे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून कडक इशारा देण्यात आला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणचा राष्ट्रीय पुरस्कार गौरव
पुढील बातमी
साताऱ्यात सयाजी विद्यालयासमोर टायर फुटून कार पलटी ; तिघे जण जखमी

संबंधित बातम्या