सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुंजवडी शाखा संलग्न श्रीराम वि. का.स सेवा सोसायटी लि., मुंजवडी संस्थेचे सभासद सचिन साधू सांगळे यांना चारचाकी वाहन कर्ज योजनेतून टाटा कर्व (EV) वाहनाचे वितरण करणेत आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचे हस्ते कर्जदार सभासदांना चाव्या प्रदान करण्यात आल्या.
याप्रसंगी डॉ राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण भागातील तळागळातील शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्हयामध्ये ३१९ शाखा व ९६५ वि. का.स. संवा संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या सेवा देत आहे. बँक ही नेहमीच जिल्हयातील शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आली आहे. शेतक-यांच्या शेती विषयक गरजांबरोबरच घर बांधणी, चारचाकी, मोटार सायकल, शैक्षणिक कर्ज अशा अकृषक कारणांसाठी देखील बँकेने कर्ज योजना राबविल्या असून माफक व्याजदर, कमीत कमी कागदपत्रे व जलद कर्ज मंजूरी व वाटप होत असल्याने या योजनांना प्रचंड प्रतिसाद मिळत असलेचे त्यांनी नमूद केले. सचिन सांगळे यांना नविन वाहन खरेदीच्या शुभेच्छा देवून विकास सेवा सोसायटी मार्फत चारचाकी वाहन कर्ज योजनेचा जिल्हयातील शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ सरकाळे यांनी केले.
सचिन सांगळे यांनी, जिल्हा बँकेने कमीत कमी कागदपत्रांत व वेळेत कर्ज उपलब्ध करून दिलेबद्दल बँकेचे आभार मानले या प्रसंगी टिएमई विभागाचे उपव्यवस्थापक संदिप शिंदे, अधिक्षक सुभाष बनसोडे, विकास अधिकारी आनंद जमदाडे, गौरव जाधव, जिवन किर्दत, बँकेचे सेवक व शेतकरी उपस्थित होते.