सातारा : तीनजणांना मारहाण करुन दमदाटी, शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मारहाण करुन दमदाटी, शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्तार पालकर, हुजेब पालकर, आसरार पालकर, आम्मार पालकर, अरहान पालकर (सर्व रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्या विरुध्द महिलेने तक्रार दिली आहे. ही घटना दि. 30 जून रोजी घडली आहे. वाहनाला कट का मारला, या कारणातून वाद झाला. वादातून कोरेगाव-सातारा रस्त्यावरील रेणुका पेट्रोल पंपासमोर तक्रारदारांच्या मुलास मारहाण करण्यात आली. तसेच तक्रारदारांच्या दोन भावांनाही घरात घुसून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.