सातारा : सातारा जिल्हा परिषदेची विषय समित्यांच्या निवडीची विशेष सभा बुधवार दि. 11 रोजी येथील छत्रपती शिवाजी सभागृहात पार पडली. या बैठकीत विषय समित्यांचे सहा सभापती निवड प्रक्रियेद्वारे निवडण्यात येऊन त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी आमदार गटाचे बाळासाहेब खंदारे आरोग्य सभापतीपदी धनंजय जांभळे तर शिक्षण सभापती पदी शंकर कीर्दत यांची निवड झाली. तर खासदार गटाकडून नियोजन सभापतीपदी अशोक शेडगे महिला व बालकल्याण सभापती पदी मोनिका घोरपडे व दुर्बल घटक विशेष कल्याण समिती सभापती संकेत साठे यांची वर्णी लागली.
सातारा नगरपरिषदेच्या श्री. छ. शिवाजी महाराज सभागृहात विषय समिती सभापती व स्थायी समिती सदस्य निवडी पार पडल्या .या निवडी विठासन अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या विशेष अधिकाराने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी एकमेव अर्ज प्राप्त झालेल्या सभापती पदांची घोषणा केली .यामध्ये सार्व. बांधकाम समिती सभापती- बाळासाहेब खंदारे, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती - धनंजय जांभळे, नियोजन आणि विकास समिती सभापती - अशोक शेडगे, महिला आणि विकास समिती सभापती - सौ. मोनिका घोरपडे, उपसभापती - सौ. सुजाता गिरिगोसावी. दुर्बल घटक विशेष कल्याणकारी समिती सभापती - संकेत साठे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती - शंकर किर्दत, स्थायी समिती सदस्य -सौ. सुजाता राजेमहाडिक, जयवंत भोसले, सूर्यकांत गोरे.
वरील प्रमाणे सर्व सभापती व स्थायी समिती सदस्य यांचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उप नगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर व पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.