फसवणूक करणा-यांकडून पाठविले जाणारे संदेश बहुधा खालीलप्रमाणे असतात. आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी देण्यात येते व अनधिकृत लिंक पाठविण्यात येऊन त्वरित दंड भरण्याचे संदेश प्राप्त होतात. DL (वाहन चालविण्याचा परवाना) सस्पेंड होणार आहे. त्वरित तपासणी करा." RTO कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलमध्ये कधीही WhatsApp द्वारे पेमेंट। पाठविली जात नाही, याची नोंद घ्यावी.
तसेच "RTO Services .apk","mParivahan_Update.apk", "eChallan_Pay.apk" अशा अनधिकृत APK अॅप्स डाउनलोड करू नयेत, कारण त्याद्वारे OTP, बैंकिंग माहिती व मोबाईलमधील इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते.
नागरिकांनी कोणताही संशयास्पद संदेश/लिंक प्राप्त झाल्यास तात्काळ खालील ठिकाणी तक्रार नोंदवावी:राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल https://www.cybercrime.gov.in
सायबर फसवणूक हेल्पलाइन - १९३०
जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन