ट्रेव्हिस हेडचा निपटारा करण्यासाठी टीम इंडिया घातक गोलंदाज संघात घेण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 07 December 2024


ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेडने पहिल्या डावात खणखणीत शतक ठोकलं आहे. ऑस्ट्रेलियाचा हा एकमेव फलंदाज होता,ज्याला टीम इंडियाच्या गोलंदाजांविरोधात शतक ठोकलं आहे. त्यामुळे या मालिकेपुरता ट्रेविस हेडचा निपटारा करण्यासाठी टीम इंडिया एका घातक गोलंदाजाला संघात घेण्याची शक्यता आहे. हा गोलंदाज गेल्या वर्षभरापासून टीम इंडियासाठी खेळला नाही. मात्र बॉर्डर गावस्कर मालिकेत त्याच्या एन्ट्रीची खूप चर्चा आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बॉर्डर गावस्कर मालिकेच्या उरलेल्या सामन्यासाठी मोहम्मद शमीला संघात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मंजुरीची वाट पाहत आहे. विशेष म्हणजे त्याच्या बॅगपासून त्याचा व्हिसा देखील तयार आहे, फक्त मंजूरीची प्रतिक्षा आहे.

मोहम्मद शमी फिटनेस टेस्टसाठी बंगळुरूला गेला होता. त्यानंतर आता या फिटनेस टेस्टची वरिष्ठ निवड समिती वाट पाहत आहे. या दरम्यान तो सध्या रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 खेळतोय. जिथे दुखापतीनंतरही त्याची कामगिरी खूप चांगली आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी करतोय. मि़डिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने वेगवान गोलंदाजासाठी आधीच कपडे तयार केले आहेत आणि त्याचा व्हिसा देखील तयार आहे आणि टेस्टमध्ये पास झाल्यानंतर त्याचा ऑस्ट्रेलिया जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पहिल्याच दिवशी विरोधकांचा सभात्याग
पुढील बातमी
‘पुष्पा 2’च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू व एक लहान मुलगा गंभीर जखमी

संबंधित बातम्या