सातारा : युवतीने रिलेशनशिप तोडल्याने शहरात एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय युवतीच्या वडिलांना शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची घटना दि ११ रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निशांत नितीन चव्हाण (रा. पंचपाळी हौद,राजधानी टॉवर शेजारी, सातारा) याने रागाच्या भरात २२ वर्षीय युवतीने रिलेशनशिप तोडल्याने युवतीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. युवतीच्या वडिलांना हाताने धक्काबुक्की करून शिवीगाळ करत रिलेशनशिप तोडल्याने तुला फार जड जाणार आहे, तुला बघून घेतो, तुला सुखाने जगू देणार नाही अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय युवतीने सातारा शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार सणस करत आहेत.