सातार्‍याच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत इतिहास घडवला : राजेंद्र चोरगे

by Team Satara Today | published on : 08 August 2025


सातारा : गेल्या चार वर्षात 15 वर्षाखालील वयोगटात स्पर्धांचे आयोजनच न झाल्यामुळे या खेळाडूंचे नुकसान होत होते. परंतू महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा संघाच्या 32 बॉक्सरच्या चमूने 23 पदके पटकावली. राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवत या खेळाडूंनी इतिहास घडवला असल्याची माहिती जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी दिली. या स्पर्धेत 11 व 13 वर्षे वयोगटात मुलींच्या जिल्हा संघाने 8 सुवर्ण व 5 रौप्य तर 10 कास्य पदके पटकावत प्रथम क्रमांक मिळवला.

तसेच या स्पर्धेतून यश निकम, शौर्य बनकर, रुद्र झोरे, कौस्तुभ चव्हाण, स्पंदन गंगावणे, रिया शिंदे, समृध्दी शिंदे, अक्षरा पवार यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना सागर जगताप, विनोद दाभाडे व मंगेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंच्या या यशाबद्दल जिल्हा क्रिडाधिकारी नितीन तारळकर, रविंद्र झुटिंग, उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सल्लागार अशोक शिंदे, राजेंद्र हेंद्रे, निवृत्ती भोसले, प्रताप गुजले, योगेश मुंदडा व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई-कुसगाव क्रशरबाबत मकरंद पाटील यांची भूमिका ग्रामस्थांच्या बाजूची : प्रमोद शिंदे
पुढील बातमी
स्निफर डॉग्स उत्तरकाशीतील दुर्घटनेत मलब्याखाली दबलेल्यांचा घेणार शोध

संबंधित बातम्या