मंगळसूत्र चोरट्याला नागरिकांनी पकडले

by Team Satara Today | published on : 12 August 2025


सातारा : शाहू कला मंदिर येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळणार्‍या संशयिताला नागरिकांनी पकडून ठेवले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मंगळसूत्र आढळून आल्याने त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी उदय वासुदेव आपटे वय 67 राहणार जिजामाता कॉलनी शुक्रवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी उर्मिला व बहीण माधुरी या शाहू कला मंदिर कडे जात असताना मागून येणार्‍या प्रसन्न भरत चव्हाण भरतगाव तालुका सातारा याने माधुरी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. माधुरी यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी चव्हाण याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मंगळसूत्र आढळून आले. हा प्रकार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सव्वा आठच्या दरम्यान घडला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के.के. गोवेकर करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उत्पादनशुल्क मंत्र्यांना जावलीतील अवैध दारू भेट देण्यावर विलासबाबा ठाम
पुढील बातमी
चार चाकी वाहन परस्पर विकल्या प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या