सातारा : छत्रपती शाहु महाराजांनी ज्या राजसदरेवरुन आदेश दिल्यामुळे मराठा साम्राजाचा विस्तार अटकेपर्यंत झाला. त्याच राजसदरेवर स्वाभिमान दिन मोठ्या दिमाखात पार पडला. किल्ले अजिंक्यताऱ्यावर सकाळपासून वातावरण शिवमय झाले होते. श्री. शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने 15 व्या वर्षीही आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला वाजतगाजत छ. शाहु महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आले. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी छ. शाहु महाराजांची पालखी खांद्यावर घेवून गडाच्या पायऱ्या चढल्या. आपोआपच शिवभक्तांच्या तोंडून जय शिवाजी जय भवानी अशा गगनभेदी घोषणा उमटून किल्ले अजिंक्यतारा निनादून सोडला.
श्री. शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वाभिमान दिनाच्या निमित्ताने किल्ले अजिंक्यताऱ्याच्या भव्य प्रवेशद्वाराला झेंडूची तोंरणे साकारण्यात आली होती. सकाळी नियोजित मुहूर्तावर गडाच्या पायथ्यापासून गोडोली गावातून मानाच्या मानकऱ्यांच्या हस्ते छ. शाहु महाराजांच्या पालखी मिरवणूकीला प्रारंभ झाला. तुतारीच्या निनादात पालखी गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचली. तेथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पालखीला खांदा देवून त्यांनी पायऱ्या चढल्या. सोबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी होते. राजसदरेवर शानदार कार्यक्रम सुरु झाला. छ. शाहु महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, डॉ. संदीप महिंद गुरुजी, विश्रांत कदम, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, नगरसेवक सागर पावशे, माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील, रेणू येळगावकर, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे अध्यक्ष सुदामदादा गायकवाड, दीपक प्रभावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचा सन्मान
स्वाभिमान दिनाच्या निमित्ताने राजसदरेवर श्री. छ. शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने नगराध्यक्ष अमोल मोहिते, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, खिदमते खल्केचे सादिक शेख, पाणी फौंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, धर्मंवीर युवा प्रतिष्ठानचे अॅङ प्रशांत नलवडे, शिवीमुक्त अभियानचे असिफ शेख, किल्यावर सलग 30 वर्ष वृक्षारोपण करणारे भरत कुंभार, अॅङ प्रीया साबळे, रानवाटाचे अमोल कोडक, दुर्गनाद प्रतिष्ठानचे श्रीनिवास वांगडे, टीम किल्ले सुंदरगडचे बकाजी निकम, शंकर कुंभार, कंमाडो अॅकॅडमी, युवा अॅकॅडमी, छ. शाहु प्रतिष्ठान, डिफेन्स अॅकॅडमी, वेद अकॅडमी, सचिन देशमुख, पूजा गायकवाड, प्रवीण साळुंखे, अंशुमन धुमाळ, प्राचार्य दिलीप गायकवाड, अंनुमन धुमाळ, प्रा. पी.एन.शिंदे, डॉ. दीपांजली पवार, डॉ. मीनल गावडे, डॉ. गीता शिंदे, तेजस्विनी फडतरे, विद्या सोडमिसे, अंजली शिंदे, सातारा सायकल क्लबचे संतोष शेडगे, सुचित्रा कडाळे, दीपा पवार, अॅङ भाग्यश्री बोकेफोडे, अॅङ मनिषा बर्गे, कर्ण अॅकॅडमी, जयहिंद अॅकॅडमी, शिवेंद्रराजे रेस्क्यु टिम, इनरव्हील क्लबच्या रुपाली गुजर, पुनम इंगवले, निलिमा भिंताडे, सुवर्णा पाटील, सामाजिक कार्यंकर्ते रवी पवार, किल्लेदार मोरेश्वर कांबळे आदींचा सन्मान करण्यात आला.
दमदार सुत्रसंचालन
जेव्हापासून किल्ले अजिंक्यताऱ्यावर स्वाभिमान दिन सोहळा आयोजित करण्यात येत आहे. तेव्हापासून अविरतपणे आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करत कार्यक्रमात सुत्रसंचालन करणारे सुनील मोरे पाटील यांनी याही वर्षीच्या कार्यक्रमात दमदार असे सुत्रसंचालन केले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गडासाठी भरीव तरतूद केल्याची दिली माहिती
साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आर्वजून गडावरील कार्यक्रमास हजेरी लावून किल्ले अजिंक्यताऱ्यांसाठी भरीव निधीची तरतूद राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट करत श्री. शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने सुरु ठेवलेल्या या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.